पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा येथे आज सकाळी 7 वाजता सुरू झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) स्थानिक जमावाने लुटले आणि दोन व्हीव्हीपीएटी मशीन एका तलावात टाकण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्याच्या मुख्य निवडणूक कार्यालयाने सांगितले की, ईव्हीएमची लूट झाली आहे. एक CU, 1 BU, दोन VVPAT मशिन तलावामध्ये टाकण्यात आल्या आहेत. सेक्टर ऑफिसरने एफआयआर दाखल केला आहे. पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
हा हल्ला तृणमूल समर्थकांनी केला असल्याचाही.आरोप होत आहे. काही पोलिंग एजन्टना मतदारकेंद्रात प्रवेश नाकारल्यावर हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी या घटनेवर टीका केली आणि म्हणाले आहेत की, पश्चिम बंगालमध्ये लोकशाही पेटली आहे.
मालवीय पुढे म्हणाले की, डायमंड हार्बर, जिथे ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत तो सर्वात प्रभावित मतदारसंघ आहे.
“या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांना धमकावले जात आहे, बूथवर बसू दिले जात नाही, त्यांची मतदानाची कागदपत्रे नष्ट केली जात आहेत… पोलिसही अभिषेक बॅनर्जी यांचे समर्थक असल्यासारकाचे वागत आहेत. णी मुस्लिमांनी त्याच्या विरोधात मतदान करणे सुरू केल्यामुळे आता तृणमूल चवताळली आहे. असे मालवीय म्हणाले आहेत.
पश्चिम बंगालमधील बारासत, बशीरहाट, डायमंड हार्बर, दम दम, जयनगर, जादवपूर, कोलकाता दक्षिण, कोलकाता उत्तर आणि मथुरापूर या नऊ जागांवर आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. .
1 जून रोजी मतदान संपल्यानंतर, एक्झिट पोलचे निकाल विविध टीव्ही चॅनेलवर प्रसारित केले जातील. निवडणूक आयोगाने 19 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 1 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत मतदान संपेपर्यंत एक्झिट पोलवर बंदी घातली आहे.
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापासून हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत.