लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज होत आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत 40.09 टक्के मतदान झाले असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.हिमाचल प्रदेशमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 48.63 टक्के सर्वाधिक मतदान झाले आहे.
सहाव्या टप्प्यात मतदान सुरू असलेल्या इतर राज्यांमध्ये बिहार–35.65 टक्के, चंदीगड–40.14 टक्के, झारखंड–46.80 टक्के, ओडिशा–37.64 टक्के, पंजाब–37.80 टक्के, उत्तर प्रदेश– 39.31 आणि पश्चिम बंगाल–45.07 टक्के अशी आकडेवारी समोर आली आहे.
लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवातील सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडमधील शेवटच्याअश्या एकूण 57 लोकसभा मतदारसंघात शनिवारी सकाळी 7 वाजता सुरू झाले आहे.
भारतीय निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, अंदाजे 5.24 कोटी पुरुष, 4.82 कोटी महिला आणि 3574 तृतीय लिंग मतदारांसह 10.06 कोटींहून अधिक मतदारांनी आज मतदान करणे अपेक्षित आहे.