स्वाती मालीवाल यांच्यावर कथित मारहाण आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांचे पीएस विभव कुमार यांच्या अडचणीत वाढ होत आहे. आज महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. स्वाती मालीवाल यांनी विभव कुमार यांच्यावर केजरीवाल यांच्या निवासस्थानी मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे विभव कुमारला 18 मे रोजी अटक करण्यात आली होती.
दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने 27 मे रोजी बिभव कुमारचा जामीन अर्ज फेटाळला होता. या प्रकरणातील सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर असलेल्या स्वाती मालीवाल कोर्ट रूममध्ये रडू लागल्या आणि विभव कुमारला जामीन न देण्याचे आवाहन केले. स्वाती मालीवाल म्हणाल्या की, जर तो बाहेर गेला तर माझ्या जीवाला धोका असेल. स्वाती मालीवाल यांनी न्यायालयात सांगितले की, मला भाजपची एजंट म्हटले जात आहे. त्यांच्याकडे मोठी ट्रॉल मशिनरी आहे. हे बाहेर आल्यास मला व माझ्या कुटुंबाला धोका आहे.
दरम्यान, 13 मे रोजी स्वाती मालीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटायला गेल्या होत्या. त्यावेळी विभव कुमारने स्वाती मालीवाल यांना बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी स्वाती मालीवाल यांनी पोलिसात एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरनंतर पोलिसांनी विभवला अटक केली.