आज शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आता पार पडली आहे. यानंतर आता तमिळानाडूतील एक्झिट पोल समोर आले आहेत. न्यूज 18 च्या पोलनुसार NDA ला फक्त 2 जागा मिळत आहेत तर इंडिया आघाडीला 37 जागा मिळत आहेत.
एबीपी-सी वोटरच्या सर्व्हेनुसार कर्नाटकमध्ये एनडीएला 23, इंडिया आघाडीला 4 जागा मिळतील, असा पोल समोर आला आहे. तर इतर उमेदवार 1 जागेवर विजयी होतील, असं पोलमध्ये सांगितलं गेलं आहे.
सर्व्हेनुसार आंध्र प्रदेशमध्ये NDA ला 22 तर इंडिया आघाडीला शून्य जागा दाखवण्यात आल्या आहेत.