लोकसभा निवडणुकीचे ७ मतदान १ जून रोजी पूर्ण झाले आहे. दरम्यान ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांची धाकधूक वाढली आहे. तसेच ७ व्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे आकडेवारी समोर आली आहे. आतापर्यंत जितके एक्झिट पोल समोर आले त्यामध्ये एनडीए म्हणजे पुन्हा एकदा मोदी सरकार येत असल्याचे दिसून आले आहे. तीन एक्झिट पोलमध्ये भाजपचा ४०० पारचा नारा खरा ठरताना दिसत आहे. त्यामुळे देशातील जनते पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पसंत दिल्याचे दिसून येत आहे.
टुडेज चाणक्य: टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला ४०० पार जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. चाणक्य पोलनुसार भाजपला ३३५ जागा मिळू शकतात. तर एनडीएला ४०० जागा मिळू शकतात. तसेच काँग्रेस पक्षाला ५० जागा मिळू शकतात. तर इंडिया आघाडीला १०७ जागांवर विजय मिळू शकतो.
न्यूज नेशनच्या पोलनुसार देशात २०२४ च्या निवडणुकीत एनडीएला ३४२ ते ३७८ जागा मिळू शकतात. तर इंडिया आघाडीला १५० ते १७० जागा मिळण्याचा अंदाज आहे . तर इतरांना २१ ते २३ जागा मिळू शकतात.
रिपब्लिक इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, ३५३ ते ३६८ जागा या एनडीएला मिळू शकतात. तर यामध्ये इंडियाचे आघाडीला ११५ ते १३० जागा मिळू शकतात. या सर्व एक्झिट पोलनुसार एनडीएला ४०० जागा मिळतांना दिसत आहे. तसेच भाजप स्वबळावर ४०० च्या किंवा त्यांनी जो ३७० चा नारा दिला होता. त्याच्या जवळ जाताना दिसत नाहीयेत.