लोकसभा निवडणुकीचे ७ व्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी पूर्ण झाले
आहे. दरम्यान ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांची धाकधूक वाढली
आहे. तसेच ७ व्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे आकडेवारी समोर आली
आहे. आतापर्यंत जितके एक्झिट पोल समोर आले त्यामध्ये एनडीए म्हणजे पुन्हा एकदा
मोदी सरकार येत असल्याचे दिसून आले आहे. तीन एक्झिट पोलमध्ये भाजपचा ४०० पारचा
नारा खरा ठरताना दिसत आहे. त्यामुळे देशातील जनते पुन्हा एकदा नरेंद्र मोदी
यांच्या सरकारला पसंत दिल्याचे दिसून येत आहे. मात्र महाराष्ट्रात महायुतीला फटका
बस्तान दिसत आहे.
महाराष्ट्रातील महायुतीचे ४५ प्लसचे स्वप्न भंगणार आहे, असे
चित्र एक्झिट पोलमधून पाहायला मिळत आहे. काल आलेल्या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजप
मोठा पक्ष ठरू शकतो. मात्र त्यांच्या जागा कमी होऊ शकतात. एक्झिट पोलनुसार राज्यात
महायुतीला २२ ते २६ जागा मिळू शकतात. पक्ष फोडाफोडीचे राजकारण भाजपला म्हणजेच
महायुतीला भोवताना दिसत आहे. भाजपच्या आत्मविश्वासाला महाराष्ट्र लगाम लावणार का
यासाठी आता ४ जूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
एबीपी सी व्होटरचा सर्व्हे समोर आला
असून, त्यात महायुतीला ४८ पैकी केवळ २२ ते २६ जागा मिळण्याचा अंदाज
वर्तविण्यात आला आहे. तर एक्झिट पोलनुसार महाविकासआघाडी राज्यात मुसंडी मारताना
दिसत आहे. मविआला २२ ते २५ जागा मिळण्याची शक्यता आहे.