लोकसभा निवडणुकीचे ७ व्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी पूर्ण झाले
आहे. दरम्यान ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांची धाकधूक वाढली
आहे. तसेच ७ व्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे आकडेवारी समोर आली
आहे. आतापर्यंत जितके एक्झिट पोल समोर आले त्यामध्ये एनडीए म्हणजे पुन्हा एकदा
मोदी सरकार येत असल्याचे दिसून आले आहे. तीन एक्झिट पोलमध्ये भाजपचा ४०० पारचा
नारा खरा ठरताना दिसत आहे. त्यामुळे देशातील जनते पुन्हा एकदा नरेंद्र मोदी
यांच्या सरकारला पसंत दिल्याचे दिसून येत आहे. मात्र महाराष्ट्रात महायुतीला फटका
बसताना दिसत आहे. दरम्यान, अखेरच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत जनतेचे आभार मानले आहेत. तसेच इंडिया
आघाडीवर टीका देखील केली आहे.
मोदींनी केलेल्या ट्विटमध्ये, ”ज्यांनी आपला
मतदानाचा अधिकार बजावला अशा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. या निवडणुकीत
संपूर्ण भारताने मतदान केलेले आहे. मतदारांचा सक्रिय सहभाग हा लोकशाहीसाठी फार
महत्वाचा भाग आहे. देशातील महिला तसेच तरुणांचे मी कौतुक करू इच्छितो. त्यांनी
उत्स्फूर्तपणे मतदान केले.”
पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये
सुरक्षा यंत्रणांचे देखील आभार मानले आहेत. एनडीएच्या कार्यकर्त्यांचे देखील
त्यांनी आभार मानले असून, कौतुक देखील केले आहे. यावेळी त्यांनी
इंडिया आघाडीवर टीका देखील केली आहे. यावेळी ते म्हणाले, ”इंडिया आघाडीला
नागरिकांना आकर्षित करता आले नाही. इंडिया आघाडी ही जातीवादी, भ्रष्ट
आहे. घराणेशाहीला पोसण्यासाठी इंडिया आघाडी करण्यात आली.”