लोकसभा निवडणुकीचे ७ व्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी पूर्ण झाले
आहे. दरम्यान ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांची धाकधूक वाढली
आहे. तसेच ७ व्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे आकडेवारी समोर आली
आहे. आतापर्यंत जितके एक्झिट पोल समोर आले त्यामध्ये एनडीए म्हणजे पुन्हा एकदा मोदी
सरकार येत असल्याचे दिसून आले आहे. तीन एक्झिट पोलमध्ये भाजपचा ४०० पारचा नारा खरा
ठरताना दिसत आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या अडचणी वाढू शकतात.
कारण बंगालमध्ये देखील चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे.
एबीपी सी व्होटरने एक्झिट पोलचे आकडे जाहीर केले आहेत. पश्चिम
बंगालमध्ये एकूण ४२ लोकसभेच्या जागा आहेत. एक्झिट पोलनुसार एनडीएला बंगालमध्ये २३
ते २७ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर तृणमूल काँग्रेसला १३ ते १७ जागा मिळण्याचा
अंदाज आहे. तर इंडिया आघाडीला १ ते ३ जागांवर यश मिळू शकते. एक्झिट पोल खरे
ठरल्यास टीएमसीला बंगालमध्ये मोठा धक्का बसू शकतो.
तर देशभरात रिपब्लिक इंडियाच्या एक्झिट
पोलनुसार, ३५३ ते ३६८ जागा या एनडीएला मिळू शकतात. तर यामध्ये इंडियाचे आघाडीला
११५ ते १३० जागा मिळू शकतात. या सर्व एक्झिट पोलनुसार एनडीएला ४०० जागा मिळतांना
दिसत आहे. तसेच भाजप स्वबळावर ४०० च्या किंवा त्यांनी जो ३७० चा नारा दिला होता.
त्याच्या जवळ जाताना दिसत नाहीयेत.