दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यां ईडीने दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी
अटक केली होती. मात्र निवडणुकीसाठी सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन दिला होता. तसेच
२ जून रोजी म्हणजे आज पुन्हा आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. मात्र
केजरीवालांनी वैद्यकीय कारणासाठी १ आठवड्याचा जामीन वाढवून मिळावा यासाठी याचिका
दाखल केली होती. मात्र कोर्टाने याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे केजरीवालांना
आज तिहार जेलमध्ये जावे लागणार आहे.
दरम्यान अरविंद केजरीवालांच्या जामीन याचिकेवर ५ जून रोजी सुनावणी
होणार आहे. तेव्हाच त्यांना जमीन मिळणार की कोठडीतच राहावे लागणार याचा निर्णय
होण्याची शक्यता आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी केजरीवालांनी आपला एक भावुक
व्हिडीओ शेअर केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आत्मसमर्पण
करण्यापूर्वी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. आपल्या संदेशात केजरीवाल म्हणाले,
‘मी
कुठेही असलो तरी दिल्लीचे काम थांबणार नाही.मला सर्वोच्च न्यायालयात प्रचारासाठी
२१ दिवसांचा जामीन दिला होता. उद्या २१ दिवस पूर्ण होत आहेत. मी परवा तुरुंगात
जाईन. या वेळी हे लोक मला किती दिवस तुरुंगात ठेवतील माहीत नाही, पण
माझी एक गोष्ट ऐका की, देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी मी तुरुंगात जाणार आहे.”
मुख्यमंत्री केजरीवाल दिल्लीच्या
जनतेला म्हणाले, ‘स्वतःची काळजी घ्या. तुरुंगात मला तुझी खूप काळजी वाटते. तुम्ही
आनंदी असाल तर केजरीवाल खुश. अर्थात मी तुमच्यामध्ये नसेन, पण काळजी करू
नका. तुमची सर्व कामे चालू राहतील. मी कुठेही असलो, आत असो की बाहेर,
दिल्लीचे
काम थांबणार नाही. तुमची मोफत वीज, मोहल्ला क्लिनिक, हॉस्पिटल,
मोफत
औषध, उपचार, महिलांसाठी मोफत बस, प्रवास, २४ तास वीज,
सर्व
कामे सुरूच राहतील.