लोकसभा निवडणुकीसाठी सर्व टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. ४ जून
रोजी निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीबरोबरच अरुणाचल प्रदेश
राज्याच्या विधानसभा निवडणूक देखील झाली होती. अरुणाचल प्रदेशच्या निवडणुकीचा
निकाल आज जाहीर होणार आहे. १९ एप्रिल रोजी विधानसभेसाठी मतदान झाले होते. त्याचा
आज निकाल जाहीर होणार आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये एकूण विधानसभेच्या ६० जागा आहेत. ६० पैकी ५०
जागांचा निकाल आज जाहीर होत आहे. तर ६० पैकी १० जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध
निवडून आले आहेत. दरम्यान अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाने ६० पैकी ४६ जागांवर आघाडी
घेतली आहे. तयामुळे अरुणाचल प्रदेशमध्ये पुन्हा पेमा खांडू यांच्या सरकारला बहुमत
प्राप्त झाले आहे. काँग्रेसला अजून एकही जागेवर खाते उघडता आलेले नाही. तर एनपीपी
६ जागांवर आघाडीवर आहे.
पासीघाट पश्चिम मतदारसंघातून भाजपचे
निनॉन्ग एरिंग सुमारे दोन हजार मतांनी आघाडीवर आहेत. राष्ट्रवादीचा तपायम पाडा
दुसऱ्या क्रमांकावर आहे. पासीघाट पूर्व एनपीपीच्या तापी दरंग आघाडीवर आहेत. भाजपचा
कलिंगा मायोंग येथे दुसऱ्या क्रमांकावर आहे. अरुणाचल प्रदेशच्या तवांग
मतदारसंघातून नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) चे नामगे त्शेरिंग आघाडीवर आहेत,
तर
भाजपचे त्सेरिंग दोर्जे सुमारे एक हजार मतांनी मागे आहेत.