लोकसभा निवडणुकीसाठी सर्व टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. ४ जून
रोजी निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीबरोबर सिक्कीम राज्याच्या
विधानसभा निवडणूक झाली होती. यासाठी १९ एप्रिल रोजी मतदान झाले होते. आज सिक्कीम
विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान सिक्कीम विधानसभेत ३२ जागांसाठी मतदान
झाले होते. सध्या सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा यांचे सरकार आहे.
यंदाच्या निवडणुकीत सिक्कीम
कर्णातीकारी मोर्चा विरुद्ध सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट यांच्यात लढत होत आहे. या
ठिकाणी भाजपा आणि काँग्रेस हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र त्यांना इथे
फार यश मिळताना दिसत नाहीये. सध्या पुन्हा एकदा सिक्कीममध्ये SMK चे
सरकार हे जवळपास निश्चित झाले आहे. ३२ पैकी ३१ जागांवर SMK आघाडीवर आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांचे सरकार येणार हे जवळपास
निश्चित झाले आहे.