Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या
अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या
आईला अटक केली आहे. याबाबतची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली
आहे. मुलाला वाचवण्यासाठी रक्ताच्या नमुन्यात अदलाबदल करण्यासंबंधात ही अटक
करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोर्शे कार
अपघात प्रकरणात आज शिवानी अग्रवालला आज पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले
होते. दरम्यान सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने शिवानी अगरवाल आणि विशाल अगरवाल यांना
५ जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे. यामुळे आता पोलिसांना दोघांची समोरासमोर चौकशी
करता येणार आहे. यातून काही नवीन माहिती समोर येते का ते पाहणे आवश्यक असणार आहे.
वेदांत अगरवाल गाडी चालवत होता अशी कबुली शिवाजी अगरवालने चौकशीत
दिली आहे. रक्ताच्या नमुन्यांची आज शिवानी अगरवालची डीएनए टेस्ट करण्यात येणार
आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा नमुना ससून
रूग्णालयात महिलेच्या रक्तासोबत बदलण्यात आला होता. रक्ताचा नमुना बदलण्यासाठी
आरोपीच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना 3 लाखांची लाच दिली होती. तर अल्पवयीन
मुलाची आई शिवानी अग्रवाल यांच्या रक्ताच्या नमुन्यासोबत अल्पवयीन मुलाचे रक्ताचे
नमुने बदलण्यात आल्याचा संशय क्राइम ब्रँचकडून व्यक्त केला जात आहे.