Salman Khan : गेल्या काही दिवसांपासून सलमान खानचे पनवेलचे फार्महाऊस गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता सलमान खानच्या फार्महाऊसबाहेरून एका 24 वर्षीय तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेली ही तरूणी दिल्लीतील असून तिने सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसबाहेर गोंधळ घातला. ही मुलगी स्वतःला सलमान खानची कट्टर फॅन असल्याचे म्हणताना दिसली आहे. आपल्याला सलमान खानसोबत लग्न करण्याच्या स्वप्नांसह, या तरूणीनं त्याला भेटण्याचा आग्रह धरला होता. मात्र, तेथील स्थानिक ग्रामस्थांनी या धक्कादायक घटनेची नोंद करून पनवेल तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली होती.
सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसवर ही घटना घडली तेव्हा अभिनेता तिथे उपस्थित नव्हता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हिडिओमध्ये कैद झालेल्या भावूक चाहतीने वारंवार सलमान खानसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तिला पुढील समुपदेशनासाठी न्यू पनवेलस्थित एनजीओ, सोशल अँड इव्हँजेलिकल असोसिएशन फॉर लव्ह येथे हलवण्यात आले आहे.
एनजीओचे संस्थापक पास्टर केएम फिलिप यांनी तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आणि सांगितले की ती सलमान खानच्या स्क्रीन इमेजच्या पूर्णपणे प्रेमात आहे. तरूणीला कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात मनोरुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे त्यांनी उघड केले. खानशी लग्न करण्याच्या उद्देशाने दिल्ली ते नवी मुंबई एकटीने प्रवास केल्याने कुटुंबाला काळजी वाटल्याने दिल्लीतील तिच्या आईशी संपर्क साधण्यात आला. तर आठ दिवस उपचार आणि मानसशास्त्रीय समुपदेशनानंतर तिने घरी परतण्याची इच्छा व्यक्त केली.