दूध हे सर्वांच्या जीवनातील एक महत्वाचा घटक आहे. लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वाना दूध आवडते. दरम्यान याच दूधासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना दुधाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. अमूल दुधाच्या किंमतीत २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. लिटरमागे २ रुपयांची वाढ करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
अमूल दुधाची किमंत वाढल्याने आता एक लिटर दुधाची किंमत ३१ रुपयांवरून ३३ रुपये इतकी होणार आहे. ऑपरेशन आणि दुधाच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्याने GCMMF ने सांगितले. अमूल गोल्ड, अमूल टी स्पेशल, अमूल शक्ती यांच्या किंमतीत वाढ करण्यात आल्याचे GCMMF ने प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे. उत्पादन खर्चात झालेल्या वाढीमुळे भारतात दुधाचे दर वाढत असतात. भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे.