जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असणाऱ्या भारतासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आज लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.सुरुवातीला बॅलेट मतांची व त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मतमोजणी केली जाणार आहे. निवडणूक आयोग देखील पूर्णपणे सज्ज झाले आहे. दरम्यान आज देशात कोणाची सत्ता येणार याचा फैसला होणार आहे. दरम्यान १जून रोजी समोर आलेय एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येत असल्याची आकडेवारी समोर आली होती. मात्र आज त्याचा अंतिम फैसला होणार आहे. दरम्यान महाराष्ट्रात देखील महायुती आणि महाविकासआघाडीमध्ये चुरशीची लढत होत आहे. राज्याच्या जनता कोणाच्या बाजूने आहे हे थोड्याच वेळात कळणार आहे. राज्यातील निकालाचे लाईव्ह अपडेट्स जाणून घेऊयात.
लोकसभा निवडणुकीसाठी पोस्टल बॅलेटच्या मतदानाला सुरुवात झाली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी पोस्टल मतांची मतमोजणी सुरु झाली आहे. थोड्याच वेळात पहिला कल समोर येणार आहे.
मतमोजणीत पहिला कल समोर आला आहे. त्यात एनडीए १० आणि इंडिया आघाडी ५ जागांवर पुढे आहे. तर ३ जागांवर इतर पक्ष पुढे आहेत.
महाराष्ट्रामध्ये सध्या महायुतीचे उत्तर मुंबईचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे आघाडीवर आहेत.
बारामतीची निवडणूक ही हायव्होल्टेज निवडणूक आहे. यामध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये बारामतीमधून सुप्रिया सुळे हे आघाडीवर आहेत.
छत्रपती संभाजीनगर मधून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे हे आघाडीवर आहेत.
चंद्रपूरमधून काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर या आघाडीवर आहेत.
पुण्यातील निवडणूक देखील अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली होती. वसंत मोरे, रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात तिरंगी लढत होती. सध्याच्या कलांमध्ये मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर आहेत.
नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आघाडीवर आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. कोल्हे हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत.
मावळमधून संजय वाघेरे आघाडीवर आहेत.
दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे आघाडीवर आहेत.
तसेच शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे हे देखील आघाडीवर आहेत.
नाशिकमधून राजाभाऊ वाजे आघाडीवर आहेत. हेमंत गोडसे यांच्यासाठी पहिल्या कलांमध्ये हा धक्का समजला जात आहे.
कल्याण – श्रीकांत शिंदे आघाडीवर
सोलापूर – प्रणिती शिंदे आघाडीवर
माढा – धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर
ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील आघाडीवर
उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड आघाडीवर
सातारा – उदयनराजे आघाडीवर
रावेर- रक्षा खडसे आघाडीवर
सिंधुदुर्ग – नाराययम राणे आघाडीवर
दिंडोरी – भास्कर भगरे आघाडीवर
ठाणे – राजन विचारे आघाडीवर
धाराशिव – ओम राजे निंबाळकर आघाडीवर
लातूर – शिवाजीराव काळगे आघाडीवर
पालघर – भारती कामडी आघाडीवर
परभणी – धनंजय जाधव आघाडीवर
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ३ हजार मतांनी धैर्यशील माने आघाडीवर
कोल्हापूरमध्ये शाहू महाराज हे आघाडीवर आहेत.
सिंधुदुर्गमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आघाडीवर आहेत.
दिंडोरी लोकसभेत केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आघाडीवर
सोलापूरमधून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर
जळगावमधून भाजपच्या स्मिता वाघ आघाडीवर
बारामतीमधून सुप्रिया सुळे आघाडीवर
यवतमाळ-वाशिममधून संजय देशमुख आघाडीवर
अहमदनगरमधून सुजय विखे पाटील आघाडीवर
NDA च्या जागा घसरल्या, शेअर मार्केट १६०० अंकांनी पडला
रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणे आघाडीवर
राज्यात भाजप मोठा पक्ष ठरण्याची शक्यता; आतापर्यंत १४ जागांवर आघाडी
शिवसेनेचे रवींद्र वायकर हे २२०० मतांनी आघाडीवर
लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. पहिले काही कल हाती आले आहेत. त्यानुसार, राज्यात महायुतीला मोठा फटका बसताना दिसत आहे. तर देशांतर्गत देखील इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
साताऱ्यात भाजपला मोठा धक्का; उदयनराजे भोसले तब्बल २७ हजारांनी पिछाडीवर
पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा २६ हजारांनी पुढे
भाजपचे उज्वल निकम पुढे
छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे आघाडीवर
लातूरमधून शिवाजीराव काळंगे आघाडीवर
बीडमधून पंकजा मुंडे केवळ १ हजार मतांनी आघाडीवर
ठाण्यात नरेश म्हस्के ३५ हजारांनी आघाडीवर
बारामतीची हायव्होल्टेज लढाई; सुप्रिया सुळे १९ हजारांनी आघाडीवर
दक्षिण मुंबईत यामिनी जाधव आघाडीवर तर, अरविंद सावंत पिछाडीवर
अमरावतीमधून नवनीत राणा आघाडीवर
ठाण्यात नरेश म्हस्के ३५ हजारांनी आघाडीवर
जालन्यातून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पिछाडीवर, कल्याण काळे आघाडीवर
मावळमधून श्रीरंग बारणे २८ हजारांनी आघाडीवर
ठाण्यातून नरेश म्हस्के ४० हजारांनी आघाडीवर, राजन विचारे पिछाडीवर
भारती पवार दिंडोरीतून पिछाडीवर
अकोल्यातून काँग्रेसचे अभय पाटील आघाडीवर, अनुप धोत्रे आणि प्रकाश आंबेडकर पिछाडीवर
चंद्रपूरमधून मुनगंटीवार सुरुवातीपासूनच पिछाडीवर
कोकणातून नारायण राणे ४ हजार मतांनी
बीडमधून पंकजा मुंडे २ हजार मतांनी आघाडीवर
साताऱ्यात उदयनराजे भोसले पिछाडीवर
लोकसभा निवडणुकीचा शेअर मार्केटमध्ये ३७०० अंकांची घसरण
बारामतीमधून सुप्रिया सुळे २१ हजारांनी पुढे
मुंबई उत्तर पूर्वमधून भाजपाचे मिहीर कोटेचा पिछाडीवर
नारायण राणेंनी घेतली ७ हजारांनी आघाडी, राऊत पिछाडीवर
उत्तरमुंबईतून उज्वल निकम आघाडीवर, वर्ष गायकवाड पिछाडीवर
अमरावतीमधून नवनीत राणा आघाडीवर
अनिल देसाई २२ हजार मतांनी आघाडीवर
ईशान्य मुंबईतून ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील आघाडीवर
दक्षिण मुंबईत अरविंद सावंत ३३ हजार मतांनी आघाडीवर
पालघरमधून हेमंत सावरा ४५ हजार मतांनी आघाडीवर
सुरेश म्हात्रे आघाडीवर, कपिल पाटील पिछाडीवर