आज जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असणाऱ्या भारतासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आज लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.सुरुवातीला बॅलेट मतांची व त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मतमोजणी केली जाणार आहे. निवडणूक आयोग देखील पूर्णपणे सज्ज झाले आहे.
आज देशात कोणाची सत्ता येणार याचा फैसला होणार आहे. दरम्यान 1 जून रोजी समोर आलेय एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येत असल्याची आकडेवारी समोर आली होती. मात्र आज त्याचा अंतिम फैसला होणार आहे. दरम्यान महाराष्ट्रात देखील महायुती आणि महाविकासआघाडीमध्ये चुरशीची लढत होत आहे. राज्याच्या जनता कोणाच्या बाजूने आहे हे थोड्याच वेळात कळणार आहे. राज्यातील निकालाचे लाईव्ह अपडेट्स जाणून घेऊयात.
उत्तर प्रदेशमध्ये भाजप 34 जागांवर आघाडीवर तर सपा 30 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजप आणि सपामझ्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.