लोकसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहे. मतमोजणी सुरु आहे. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाने अभिनेत्री कंगना रानौतला तिकीट दिले आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी या लोकसभा मतदारसंघात कंगना रानौत विरुद्ध विक्रमादित्य सिंग यांच्यात लढत होत आहेत. या निवडणुकीत कोण जिंकणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. दरम्यान पहिल्या काही कलांमध्ये कंगना रानौत पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता कंगना रानौतने ३६ हजारांची आघाडी घेतली असून, सध्या त्या विक्रमादित्य सिंग यांच्या पुढे आहेत.