अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघात पिछाडीवर असलेल्या पीडीपी (जम्मू और कश्मीर पीपुल्स डेमोक्रेटिक पार्टी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी आपला पराभव स्वीकारला आहे.एक्सवरील एका पोस्टमध्ये, मेहबूबा म्हणाल्या आहेत की, “जिंकणे आणि हरणे हा खेळाचा एक भाग आहे, जो त्यांच्या पक्षाला नामोहरम करू शकत नाही.
लोकांच्या निर्णयाचा आदर करून, मी आमच्या पीडीपी कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे त्यांच्या कठोर परिश्रमासाठी आणि सर्व अडचणींना न जुमानता पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानते. ज्या लोकांनी मला मतदान केले त्यांचे मी मनापासून आभार मानते”.
अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघात नॅशनल कॉन्फरन्सचे (JKNC) मियां अल्ताफ 165512 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना आतापर्यंत 3,10,288 मिळाले आहेत. दुसरीकडे, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती यांना आतापर्यंत केवळ 144776 मते मिळाली आहेत.