लोकसभा निवडणुकीचे निकाल आज देशासमोर आले आहेत. एकक्सित पोलनुसार एनडीएला एकहाती सत्ता मिळेल आणि नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असे चित्र पाहायला मिळाले. मात्र आज प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाहीये. कारण ५४३ पैकी एनडीएला २९१ तर त्यात भाजपला २३९ जागा मिळाल्या आहेत. तर इंडिया आघाडीने देखील दमदार कामगिरी करत २३६ जागांवर आघाडी मिळविली आहे. महाराष्ट्रात देखील महायुतीला मोठा फटका बसला आहे. तर महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. तर आतापर्यंत महाराष्टातील काही जागांचे निकाल लागले आहेत. तर कोणाला किती जागा मिळाल्या आहेत, त्याबद्दल जाऊन घेऊयात.
नंदुरबार – गोवाल पाडवी (मविआ)
जळगाव – स्मिता वाघ (महायुती)
रावेर – रक्षा खडसे (महायुती)
नागपू -नितीन गडकरी (महायुती)
चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर (मविआ)
नाशिक- राजाभाई वाजे(मविआ)
पालघर- हेमंत सावरा (महायुती)
कल्याण- श्रीकांत शिंदे (महायुती)
मुंबई-उत्तर- पियुष गोयल (महायुती)
मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई( मविआ)
धाराशिव- ओमराजे निंबाळकर (मविआ)
सांगली- विशाल पाटील (अपक्ष)
कोल्हापूर- शाहू महाराज छत्रपती (मविआ)
पुणे – मुरलीधर मोहोळ (महायुती)
बारामती – सुप्रिया सुळे (मविआ)
लातूर – डॉ. शिवाजीराव कोळगे
मावळ – श्रीरंग बारणे (महायुती)
वायव्य मुंबई – अमोल कीर्तिकर (मविआ)