Bajarang Sonawane : बीड लोकसभेत बजरंग सोनावणे यांचा मोठा विजय झाला असून भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत बजरंग सोनावणे हे विजयी ठरले आहेत. अशातच आता नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
बजरंग सोनावणे हे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात काहीजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
काल विजय झाल्यानंतर बजरंग सोनावणे हे रात्री उशिरा मनोज जरांगेंच्या भेटीसाठी निघाले होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यातील एक गाडी बजरंग सोनावणेंच्या गाडीला धडकली. त्यामुळे या अपघातात काहीजण जखमी झाले आहेत. तर सध्या या अपघातातील जखमींवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये बजरंग सोनावणे यांचा 6 हजार 553 मतांनी विजय झाला आहे. सोनावणेंना 6 लाख 83 हजरा 950 मतं मिळाली आहेत. तर पंकजा मुंडेंना 6 लाख 397 मतं मिळाली आहेत.