Nitish Kumar-Tejashwi Yadav : काल (4 जून) देशातील लोकसभा निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळए आता दिल्लीमध्ये नवीन सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीमध्ये एनडीएची बैठक होणार आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष इंडिया आघाडीची देखील महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्लीत दाखल होणार आहेत. तर तेजस्वी यादवही इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीला रवाना होणार आहेत.
विशेष म्हणजे दिल्लीला रवाना होण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेजस्वी यादव दे दोन्ही नेते एकाच विमानानं रवाना झाले आहेत. आज सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी ते दोघं दिल्लीला एकाच विमानानं रवाना झाले आहे. तर दिल्लीत नितीश कुमार एनडीएच्या बैठकीत सहभागी होणार असून आज संध्याकाळी तेजस्वी यादव हे इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत.
दरम्यान, आज TDP आणि JDU दिल्लीत भाजपला पाठिंब्याची पत्रं सादर करणार आहेत. तर त्यानंतर NDA पुढील सरकार स्थापनेचा दावा करणार आहे.