NDA Government : आता लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं (NDA) बहुमताचा आकडा गाठला आहे. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विराजमान होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत.
एकिकडे नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याचं निश्चित झालं असताना दुसरीकडे आता एनडीए सरकारच्या शपथविधीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 9 जून रोजी एनडीए सरकारचा शपथविधी होणार असल्याची मोठा माहिती समोर आली आहे.
या दरम्यान राष्ट्रपती भवनाकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. या निवेदनानुसार आज (5 जून) ते 9 जून या कालावधीमध्ये राष्ट्रपती भवनाचं सर्किट-1 सर्वासामान्यांसाठी बंद राहणार आहे. कारण यावेळी राष्ट्रपती भवनामध्ये नव्या सरकारच्या शपथविधीची तयारी करण्यात येणार आहे.