काल लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहे. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असले तर भाजपाला वैयक्तिकपाने बहुमत गाठता आलेले नाही. तसेच महाराष्ट्रात देखील महायुतीला विशेष करून भाजपाला मोठा फटका बसला आहे. दरम्यान एनडीएने २९२ जागांवर तर इंडिया आघाडीने २३४ जागांवर विजय मिळविला आहे. एनडीएमध्ये २९२ पैकी भाजपने एकूण २४० जागा जिंकल्या आहेत’ त्यामुळे जरी तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होणार असले तरी देखील त्यांना एनडीएतील घटक पक्षांची साथ घ्यावी लागणार आहे. दरम्यान आज दिल्लीत एनडीएचे बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावर सत्तास्थापनेवर चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर मोदी हे राष्ट्रपतींकडे सरकार स्थापनेचे पत्र देऊ शकतात.
शुक्रवारी ७ जून रोजी दुपारी 2.30 वाजता संसद भवनात एनडीएच्या खासदारांची बैठक होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. या बैठकीला एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विविध पक्षांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजेच ८ जून रोजी नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात. हा शपथविधी कार्यक्रम संध्याकाळी ७ ते ८ दरम्यान होऊ शकतो.