राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, जे आज इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत पोचले आहेत. तेथे पोचताच पत्रकांराशी संवाद साधताना त्यांनी “थोडा धीर धरा. थांबा आणि पहा,” असे म्हणत सूचक वक्तव्य केले आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आलेले तेजस्वी यादव आणि एनडीएच्या बैठकीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे एकाच फ्लाइटने दिल्लीत पोहोचले आहेत.
आपले काका आणि बिहारचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत त्याच फ्लाइटमध्ये प्रवास करतानाचे फोटो व्हायरल झाल्याबद्दल विचारले असता तेजस्वी यादव यांनी काय घडतंय ते पाहत राहा असे म्हणत आम्ही एकमेकांना शुभेच्छा दिल्या.असेही सांगितले.
तर नितीश कुमार यांनीही दिल्लीत येऊन सरकार स्थापन करणार असल्याची ग्वाही दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान होण्याच्या तयारीत आहेत. , परंतु भाजपला त्यांच्या युतीमधील इतर पक्षांच्या समर्थनाची आवश्यकता असेल ज्यामध्ये जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू. यांचा समावेश आहे.
नायडू आणि नितीश या दोघांनीही एनडीए सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे.मात्र इंडिया गटही सत्तास्थापनेसाठी उत्सुक असल्याने चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले जात आहे.