निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहे. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असले तर भाजपाला वैयक्तिकपणाने बहुमत गाठता आलेले नाही. तसेच महाराष्ट्रात देखील महायुतीला विशेष करून भाजपाला मोठा फटका बसला आहे. दरम्यान एनडीएने २९२ जागांवर तर इंडिया आघाडीने २३४ जागांवर विजय मिळविला आहे. एनडीएमध्ये २९२ पैकी भाजपने एकूण २४० जागा जिंकल्या आहेत’ त्यामुळे जरी तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होणार असले तरी देखील त्यांना एनडीएतील घटक पक्षांची साथ घ्यावी लागणार आहे. दरम्यान आज दिल्लीत एनडीएचे बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान आज पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला राजीनामा सादर केला आहे. दरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी मोदींचा राजीनामा मंजूर केला आहे. पुढील सरकार स्थापन होईपर्यंत मोदी हे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहणार आहेत. आज राजधानी दिल्लीत एनडीएची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शपथविधी आणि इतर गोष्टींबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.