लोकसभा निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे. यामध्ये एनडीए सरकारने केंद्रात चांगलीच बाजी मारली आहे. मात्र, भाजपने हवी तशी चांगली कामगिरी केलेली नाही. भाजपला अनेक राज्यांमध्ये जोरदार फटका बसला आहे. यामध्ये महाराष्ट्रातही भाजपला जास्त जागा जिंकता आल्या नाहीत, त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.
महाराष्ट्रात भाजपला जोरदार फटका बसला असून महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. तर आता या पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. देवेंद्र फडणवीसांनी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला राज्यात अपेक्षित यश मिळालं नसल्याची कबुली दिली आहे. यावेळी त्यांनी मोठा निर्णय देखील घेतला आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मला सरकारमधून मोकळं करावं, अशी विनंती मी नेतृत्त्वाकडे करणार आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलं आहे. तसेच मुंबईच्या अध्यक्षांनी स्वत:लक्ष घातलं होतं. तसेच आता जो पराभव झाला आहे त्याची सर्व जबाबदारी माझी आहे”, असे फडणवीस म्हणाले.
“मला आता विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे. मला सरकारमधून मोकळं करावं, अशी विनंती मी करणार आहे. कारण जर मी बाहेर रोहिलो तर मी काम करेन. मला आता पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे”, असेही फडणवीस म्हणाले.