काल ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहे. त्यासोबतच
काल ओडिशा विधानसभेचा निकाल देखील जाहीर झाला आहे. ओडिशा विधानसभेमध्ये भाजपाने
बहुमत प्राप्त केले आहे. तब्बल २४ वर्षानंतर ओडिशामध्ये सत्ताबदल झाला आहे. ओडिशा
विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर बीजेडी प्रमुख आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक
यांनी ओडिशाचे राज्यपाल रघुबर दास यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे.
1997 पासून ओडिशावर
राज्य करणाऱ्या बिजू जनता दलाचा भाजपाने पराभव केला. नवीन पटनाईक यांची
मुख्यमंत्री म्हणून तब्बल २४ वर्षांनी सत्तेपासून डूर ठेवले. २०२४ च्या लोकसभा
निवडणुकीत देखील भाजपने राज्यातील २१ पैकी २० जागा जिंकून चांगली कामगिरी केली
होती, उर्वरित एक जागा काँग्रेसने जिंकली आहे. त्यामुळे ओडिशा राज्यात
तब्बल २४ वर्षानंतर सत्ताबदल होऊन भाजपाचे सरकार आले आहे.