निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहे. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असले तर भाजपाला वैयक्तिकपाने बहुमत गाठता आलेले नाही. तसेच महाराष्ट्रात देखील महायुतीला विशेष करून भाजपाला मोठा फटका बसला आहे. दरम्यान एनडीएने २९२ जागांवर तर इंडिया आघाडीने २३४ जागांवर विजय मिळविला आहे. एनडीएमध्ये २९२ पैकी भाजपने एकूण २४० जागा जिंकल्या आहेत’ त्यामुळे जरी तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होणार असले तरी देखील त्यांना एनडीएतील घटक पक्षांची साथ घ्यावी लागणार आहे. दरम्यान दिल्लीत एनडीएची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
नरेंद्र मोदी यांचा ८ जून रोजी शपथविधी होऊ शकतो. दरम्यान आजच्या बैठकीला टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह एनडीएमधील सर्व घटक पक्षांचे महत्वाचे नेते उपस्थित आहेत. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झाली आहे. याआधी पंतप्रधान मोदींनी आपला राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे सुपूर्त केला आहे. एनडीएच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी आणि एनडीए आजच राष्ट्रपतींकडे जाऊन सत्तस्थपनेचा दावा करण्याची शक्यता आहे.