काल लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहे. एनडीएला स्पष्ट बहुमत
मिळाले असले तर भाजपाला वैयक्तिकपाने बहुमत गाठता आलेले नाही. उत्तर प्रदेश,
महाराष्ट्र
आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपाला अपेक्षित
यश मिळालेले नाही. मध्यप्रदेशमध्ये मात्र भाजपने अत्यंत उत्तम कामगिरी केली आहे.
२९ पैकी २९ जागा जिंकल्या आहेत. लोकसभा निवडणूक २०२४ अंतर्गत, मध्य
प्रदेशातील सर्व २९ जागांचे निकाल मंगळवारी मतमोजणीनंतर रात्री उशिरा जाहीर झाले.
मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाने (भाजप) क्लीन स्वीप केला आहे.
काँग्रेसला येथे
एकही जागा मिळवता आलेली नाही. भाजपने राज्यातील सर्व २९ जागा जिंकल्या आहेत.
राज्य आणि देशभरातील विजयाचे औचित्य साधून भोपाळ येथील भाजपच्या
प्रदेश कार्यालयात मंगळवारी संध्याकाळी विजय उत्सव साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री
डॉ. मोहन यादव, भाजपचे प्रदेशाध्यक्ष विष्णुदत्त शर्मा, माजी
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि प्रदेश संघटन सरचिटणीस हितानंद यांच्यासह
वरिष्ठ नेतृत्वाने कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आणि जनतेचे आभार मानले.
निकालांबद्दल बोलायचे झाले तर, इंदूरमध्ये
भाजपला लोकसभेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळाला आहे. येथून
शंकर ललवाणी विक्रमी ११ लाख ७५ हजार ९२ मतांनी विजयी झाले. इंदूरच्या जागेवर NOTA
दुसऱ्या
स्थानावर आहे. येथे NOTA ला २ लाख १८ हजार ६७४ मते मिळाली आहेत.
हा देखील एक विक्रमच आहे. इतिहासात यापूर्वी कधीही एका जागेवर नोटाला इतकी मते
मिळाली नव्हती. इंदूरमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बसपाच्या उमेदवाराला ५१६५९
मते मिळाली.