हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्तानचे आराध्य दैवत. ६ जून म्हणजेच उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे. यंदा शिवराज्याभिषेक दिनाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे शिवभक्तांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी स्वराज्याची राजधानी दुर्ग दुर्गेश्वर रायगड देखील सजला आहे. शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत.
शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने लाखो शिवभक्त रायगडावर दाखल होत आहेत. या सोहळ्यासाठी पोलीस आणि प्रशासन देखील सज्ज झाले आहे. रायगडावर जाण्यासाठी रोपवेची सुविधा आहे. मात्र त्याला काही मर्यादा देखील आहे. दरम्यान राज्याभिषेक दिनाच्या सोहळ्यासाठी रोपवे केवळ प्रशासन आणि प्रशासनासाठी चालू ठेवण्यात येणार आहे. तसेच सर्वानी खबरदारी घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने शिवभक्तांना केले आहे.