लोकसभा निवडणुकीनंतर लवकर राज्यात विधानपरिषदेच्या निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने एनडीएला म्हणजेच राज्यात महायुतीला नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. मात्र कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपने तिसऱ्यांदा निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र या ठिकाणी मनसेने अभिजित पानसे यांना उमेदवारी देऊन भाजपला धक्का दिला होता. आता त्याच जागेसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे.
मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेने आता माघार घेतली आहे. राज ठाकरे यांची मनधरणी करण्यात भाजपला यश आले आहे. दरम्यान कोकणात भाजप विरुद्ध माणसे असा सामना रंगणार असल्याने चर्चाना उधाण आले होते. चर्चा करण्यासाठी निरंजन डावखरे आणि प्रसाद लाड हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर मनसेने हा निर्णय घेतला आहे. निरंजन डावखरे हे दोन टर्म कोकण पदवीधर संघातून आमदार आहेत. यावेळी देखील भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे.