पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांना आपल्या देशातील दिग्गजांसोबतच परदेशातील दिग्गजांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये आता आज पंतप्रधान मोदींना कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा केली. यादरम्यान, दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांच्या परस्पर सहकार्याचा आणि वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि बहुआयामी संबंध मजबूत करण्यावर चर्चा केली.
पंतप्रधान मोदींनी या संभाषणादरम्यान अरब देशाच्या अमीरांचे भारतातील लोकांबद्दलच्या शुभेच्छा आणि सकारात्मक भावनांबद्दल आभार मानले. तसेच पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी संभाषणादरम्यान फेब्रुवारीमध्ये आपल्या कतार भेटीची आठवण करून दिली आणि शेख तमीम बिन हमाद अल थानी यांना लवकरच भारत भेटीचे निमंत्रण दिले.
तसेच पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांचा फोन आला होता. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले, तर दोन्ही नेत्यांनी भारत आणि कतारमधील मैत्रीपूर्ण आणि बहुआयामी संबंध अधिक दृढ करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.