आफ्रिकन देश असलेल्या मलावीचे उपराष्ट्रपती सॉलोस चिलिमा आणि त्यांच्या पत्नीसह इतर नऊ लोकांचा मृत्यू झाला असून विमान चिकांगावा पर्वत रांगेत कोसळले असल्याची बातमी समोर आली आहे.
मलावी संरक्षण दलाचे विमान सोमवारी सकाळी राजधानी लिलोंगवे येथून उड्डाण घेतल्यानंतर रडारवरून गायब झाले.होते. हे विमान बेपत्ता असल्याचे कळताच मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली. आज २४ तासांच्या शोध मोहिमेनंतर या सर्वांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मलावीचे अध्यक्ष लाजरस चकवेरा यांनी सांगितले की, 24 तासांच्या शोध मोहिमेनंतर उपराष्ट्रपतींच्या विमानाचे अवशेष सापडले आहेत.मलावीची राजधानी लिलोंगवे येथून लष्करी विमानाने उड्डाण केल्यानंतर सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात विमानातील सर्वांचा मृत्यू झाला आहे.
सीबीएस न्यूजच्या वृत्तानुसार, मलावीच्या माजी ॲटर्नी जनरलच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी विमानातील सॉलोस चिलिमा आणि इतर प्रवास करत होते, तेव्हा त्यांचे विमान रडारवरून गायब झाले होते. .
हवाई वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, खराब दृश्यमानतेमुळे, लिलोंगवेच्या उत्तरेस सुमारे 200 मैल अंतरावर असलेल्या मझुझू विमानतळावर विमान उतरू शकले नाही आणि उड्डाण गायब झाल्यावर वैमानिकाला राजधानीकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला होता.
मलावीचे अध्यक्ष लाझारस चकवेरा यांनी मंगळवारी राष्ट्रीय शोक दिवस घोषित केला असून राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही घोषणा करण्यात आली आहे.