सध्या राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, मराठवाडा, लातूर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी अशा अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर पावासमुळे दरड कोसळल्याच्या अनेक घटना सध्या समोर येत आहेत. यामध्ये आता रत्नागिरीतही दरड कोसळल्याची घटना घडली आहे.
रत्नागिरीतील खेड तालुक्यात अस्तान धनगरवाडी या गावातील मुख्य रस्त्यावर दरड कोसळली आहे. भूसख्खलनामुळे ही दरड कोसळली असून यामुळे परिसरातील अनेक गावांचे संपर्क तुटला आहे.
दरड कोसळल्यामुळे तेथील वाहतुक देखील ठप्प झाली आहे. तसेच यामुळे शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही दरड कोसळल्यानंतर शेतांमध्ये माती आणि दगडांचा ढिगारा पसरला असून प्रचंड नुकसान झाले आहे.