नुकतीच भाजप पक्षाने ओडिशाच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली आहे. मोहन चरण माझी हे ओडिशाचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत, भाजप हायकमांडच्या वतीने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भूपेंद्र यादव यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तर आज झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मोहन चरण माझी यांची मुख्यमंत्री पदासाठी निवड करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री पदासोबतच दोन उपमुख्यमंत्र्यांचीही भाजपने ओडिशासाठी घोषणा केली आहे. पक्षाने कनक वर्धन सिंग देव यांना राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे. तर राज्याला प्रवती परिदा यांच्या रूपाने महिला उपमुख्यमंत्री देखील मिळाल्या आहेत.
मोहन चरण माझी हे ओडिशाचे 15 वे मुख्यमंत्री असणार आहेत. भाजपने माहिती दिली की, ओडिशाचे नवे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, उपमुख्यमंत्री कनक वर्धन सिंग देव आणि उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांचा शपथविधी सोहळा बुधवार (12 जून) होणार आहे.