डोंबिवलीतील MIDC मधील एका कंपनीमध्ये आणखी एक स्फोट झाल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये एका कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला होता, ज्यामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. अशातच आता आणखी एका कंपनीमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली एमआयडीसी फेज-2 मधील एका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. तर या कंपनीत अनेकजण अडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. धक्कादायक म्हणजे अद्यापही काही स्फोटांचे आवाज येत आहेत. त्यामुळे तेथील परिसरातील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी तातडीनं दाखल झाल्या आहेत. तर सध्या आग विझवण्याचे काम यु्द्ध पातळीवर सुरू आहे.