उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. अयोध्येत राम मंदिर पूर्ण झाल्यानंतर देखील लोकांनी भाजपला नाकारले. तर या पराभवानंतर आता मोदी 3.0 सरकारचे कामकाज सुरू झाले असून त्यांनी अयोध्येसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
लवकरच अयोध्येत नॅशनल सिक्यूरिटी गार्डचे (NSG) हब बनवण्यात येणार आहे. मागील तीन दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील इतर संवेदनशील ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तर अतिरेक्यांकडून होणारे हे हल्ले लक्षात घेता मोदी सरकारने अयोध्येत नॅशनल सिक्यूरिटी गार्डचे (NSG) हब बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
अयोध्येत राम मंदिर झाल्यानंतर त्याच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे आता सुरक्षेच्यादृष्टीने केंद्र सरकारने अयोध्येत एनएसजी कमांडो तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. अयोध्येत दर्शनासाठी येणाऱ्या रामभक्तांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.