जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात एका न्यायालयाने पाकिस्तानस्थित आठ संशयित दहशतवादी हस्तकांना गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आठ जण वर्षानुवर्षे फरार असून, अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर आता नोटिसा चिकटवल्या आहेत.
उपन्यायाधीश उरी यांच्या न्यायालयाने आठ संशयितांना मोहम्मद आझाद, नसीर अहमद, दोघेही कुंडी बरजाला येथील रहिवासी, जबला उरी येथील करीम दिन, बडा गोवाहलनचे मोहम्मद हाफीज मीर, सिंगतुंग गोवाहलनचे मीर अहमद, दर्दकूटचे बशीर अहमद, गौहलन येथील शौकत अहमद पासवाल ,सौहाराचा अहद भट यांना बारामुल्ला पोलिसांनी दाखल केलेल्या अर्जानुसार दहशतवादी म्ह्णून घोषित केले आहे या आठ हस्तकांविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. .
हे दहशतवादी हँडलर सध्या पाकिस्तानमध्ये असून वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांसोबत काम करत आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, या आठ दहशतवादी हँडलर्सविरुद्ध कलम 87 सीआरपीसी अंतर्गत आदेश प्राप्त झाले आहेत, जे न्यायालयाच्या निर्देशांनुसार त्यांच्या निवासस्थानावर आणि सार्वजनिक ठिकाणी चिकटवले गेले आहेत.तसेच त्यांना एक महिन्याच्या आत न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगितले आहे, जर ते हजर झाले नाहीत तर कलम 88 CrPC अंतर्गत मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया त्यांच्याविरुद्ध सुरू केली जाईल असे पोलीस म्हणाले आहेत.