ओडिशामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. तर आज (12 जून) भाजपकडून मोहन चरण माझी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच आजच्या या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी झाले आहेत. भव्य मैदानावर झालेल्या समारंभात राज्यपाल रघुबर दास यांनी मोहन यादव यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.
मुख्यमंत्री मोहन माझी यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री कनकवर्धन सिंग देव आणि प्रवती परिदा यांनी देखील शपथ घेतली. मुख्यमंत्र्यांसह सुरेश पुजारी, रबीनारायण नायक, नित्यानंद गोंड आणि कृष्ण चंद्र पात्रा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
या शपथविधी सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. तर या सोहळ्यात पंतप्रधान मोदी मंचावर पोहोचताच राज्यपाल रघुबर दास आणि नवनियुक्त मुख्यमंत्री मोहन माझी यांनी त्यांचे स्वागत केले.