टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 25वा सामना भारत आणि अमेरिका यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजयी संघ सुपर 8 फेरीत खेळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. भारतीय संघाने या खेळपट्टीवर दोन सामने खेळले असून त्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या विजयासाठी टीम इंडिया आतुर आहे.अर्थातच या सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
भारताचा कॅप्टन रोहित शर्मा यानं टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून आता अमेरिका पहिल्यांदा फलंदाजीला उतरणार आहे.
भारत त्याच प्लेइंग इलेव्हनसह सामन्यात उतरत आहे तर यूएसएचा कर्णधार मोनांक पटेल सामन्यात बाहेर असणार आहे.
नाणेफेकीच्या वेळी रोहित म्हणाला, “आम्ही प्रथम गोलंदाजी करू. गेल्या दोन सामन्यांत तो अधिक चांगला खेळला आहे, परंतु तुम्हाला परिस्थितीचे त्वरीत आकलन करावे लागेल आणि नंतर खेळाला सामोरे जावे लागेल. हे सर्व सतत चांगले होत राहणे आणि राखणे यासाठी आहे. योग्य गोष्टी करणे महत्त्वाचे आहे,”