केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी एका गुंडाला अटक करण्यात आली आहे. या अटक करण्यात आलेल्या गुंडाला बुधवारी (12 जून) कर्नाटकातील बेळगावी येथील न्यायालयाच्या आवारात पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याबद्दल बेदम मारहाण करण्यात आली.
अटक करण्यात आलेला गुंड जयेश पुजारी याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. तर त्याने पाकिस्तान समर्थक घोषणा देताच न्यायालयात उपस्थित असलेल्या लोकांनी आणि वकिलांनी त्यांना बेदम मारहाण केली.
यादरम्यान न्यायालयात हजर करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाने मोठ्या कष्टाने त्याची सुटका करून तिथून बाहेर काढले. त्यानंतर त्याला एपीएमसी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. कर्नाटकचे आयपीएस अधिकारी आलोक कुमार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.