पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघात प्रकरणी नुकतीच एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांनी खळबळजनक दावा केला आहे. पोर्शे अपघात प्रकरणातील मृत तरूण-तरूणीने मद्य प्राशन केल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
अनिल देशमुख यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले,हे उघड झाले आहे. आता माजी गृहमंत्री म्हणुन माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या Viscera Report मध्ये Alcohol +ve यावे याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे.”
https://x.com/AnilDeshmukhNCP/status/1801089922008326410
अनिल देशमुख यांही पोस्ट शेअर केल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. कारण या प्रकरणातील मृत तरूणी तरूणी हे दारू पिऊन गाडी चालवत होते त्यामुळे हा अपघात झाल्याचं न्यायालयात सिद्ध करता येईल आणि आरोपी वेदांत अग्रवाल लवकर सुटेल यासाठी सध्या प्रयत्न सुरू असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.