पश्चिम बंगालमधले भाजप नेते अमित मालवीय यांनी कोलकातास्थित वकील शंतनू सिन्हा यांनी त्यांच्याविरुद्ध केलेल्या कथित “अपमानजनक” टिप्पणीला प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेते अमित मालवीय म्हणाले आहेत की,तृणमूलचे हे त्यांना पश्चिम बंगालपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न आहेत, जे कधीच यशस्वी होणार नाहीत”.
भाजपचे बंगालचे सहप्रभारी आणि पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख मालवीय यांनी मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना संदेशखालीचे प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला आहे.
त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हंटले आहे की, “ममता बॅनर्जी यांनी संदेशखालीचे तृणमूलवरचे आरोप पुसण्यासाठी इतर कायदेशीर मार्ग शोधावेत आणि माझ्यावर चिखलफेक करू नये जोपर्यंत संदेशखालच्या महिलांना न्याय मिळत नाही आणि बंगालमध्ये भाजप तृणमूलला सत्तेतून हटवत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही” .