नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाबरोबरच अजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी (National Security Adviser) नियुक्ती करण्यात आली आहे. अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. तर डॉ. पी.के. मिश्र हे त्यांचे प्रधान सचिवपदी कायम राहणार आहेत.राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे एनडीए सरकारमधील त्यांच्या सध्याच्या भूमिकेत राहणार आहेत.
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने बुधवारी 10 जून 2024 पासून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच मे 2014 मध्ये प्रथमच NSA बनलेले डोवाल , भाजपच्या नेतृत्वाखालील NDA सरकारमध्ये भूमिकेत राहिले.
1968 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी, डोवाल हे प्रसिद्ध दहशतवाद विरोधी तज्ञ आणि आण्विक मुद्द्यांचे तज्ञ आहेत. डोवाल यांनी पंजाबमध्ये आयबीचे ऑपरेशनल प्रमुख म्हणून काम केले आहे.तसेच उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईकचे नियोजन आणि धोरण ठरवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने पीके मिश्रा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून पुन्हा नियुक्ती केली आहे. तर पंतप्रधान मोदींचे सल्लागार म्हणून अमित खरे, lAS (निवृत्त) (JH:1985), आणि तरुण कपूर, lAS (निवृत्त) यांच्या नियुक्तीलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने 10.06.२०२४ पासून पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी पंतप्रधान कार्यालयात,भारत सरकारच्या सचिव पदावर खालील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे.