बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नुकतीच 2024 लोकसभा निवडणुकीत मंडीमधून खासदार म्हणून निवडून आली आहे. तिने काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांचा पराभव करून विजय मिळवला आहे. तर आता बॉलिवूड इंडस्ट्रीत 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर कंगनाने राजकारणात प्रवेश केला आहे. तसेच आता मंडीतून खासदार निवडून आलेल्या कंगनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजकारणाबाबत धक्कादायक विधान केले आहे.
कंगनाला याआधीही तिला राजकारणात येण्याच्या ऑफर आल्या होत्या, असं सांगितलं. तर कंगनाने तिच्या राजकीय आणि अभिनय कारकिर्दीत संतुलन कसे राखले जाईल हे सांगितले. तिने असेही सांगितले की, 18 वर्षांपूर्वी गँगस्टरमध्ये पदार्पण केल्यापासून तिला राजकारणात येण्याच्या ऑफर आल्या होत्या, परंतु तिने राजकारणाऐवजी चित्रपटांमध्ये करिअर करणे चांगले मानले होते.
पुढे राजकारण आणि अभिनय यांच्यातील तुलनेबाबत कंगना म्हणाली की, राजकारण करण्यापेक्षा चित्रपटात काम करणे सोपे आहे. येथे खूप मेहनत घेतली जाते. हे डॉक्टरांच्या आयुष्यासारखे कठीण जीवन आहे. जिथे फक्त त्रासलेले लोक भेटायला येतात. जेव्हा तुम्ही चित्रपट पाहायला जाता तेव्हा तुम्ही खूप निवांत असता. पण, राजकारण तसे नसते ते खूप अवघड असते, असेही कंगना म्हणाली.