सध्या इटलीत G-7 परिषद होत आहे. तर या परिषदेपूर्वी इटलीच्या संसदेत मोठा गोंधळ निर्माण झाला. ज्यामध्ये एकाला जोरदार मारहाण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या संसदेतील या गोंधळाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
संसदेमध्ये एका बिलावरून खासदारांमध्ये मोठा वाद झाला. यावेळी खासदारांमध्ये एकमेकांना धरपकड आणि मारहाण झाल्याची घटना घडली आहे. तर झालं असं की देशातील काही भागांना स्वायत्तता देण्यासंबंधाचं एक विधेयक होतं. तर या विधेयकाला काही खासदारांनी विरोध केला आणि त्यामुळे संसदेत मोठा गोंधळ निर्माण झाला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत असं दिसत आहे की, विरोधी पक्षाचे खासदार लियोनार्डो डोनो हे मंत्री रॉबर्टो कॅलडेरोली यांना इटलीचा झेंडा देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण कॅलडेरोली यांनी तो झेंडा स्वीकारण्यास नकार दिला आणि ते मागे सरकले. यावरून इतर खासदार तिथे जमले आणि त्यांच्यामधील वादाचं रूपांतर मारहाणीत झालं.
https://x.com/TheNewsRoom0/status/1801021884630233181
दरम्यान, इटलीमधील अपुनियामध्ये 50व्या G-7 शिखर संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर या संमेलनामध्ये जगभरातील मोठ्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख सहभागी होत आहेत. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहेत.