आज राज्यात बहुतेक भागात पावसाच्या रिमझिम सरी (Monsoon) पाहायला मिळतील असा अंदाज हवामान खात्याने(IMD) वर्तवला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या भागात मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी पडतील अशी शक्यता आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे.
दक्षिण कोकणात आज अनेक ठिकाणी तर आज आणि उद्या कोकणात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कोकणात काही ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस तर काही अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
राज्यातील बहुतांश भागात मान्सून या वर्षी वेळेत दाखल झाला आहे. मुंबईतही मान्सूनची दमदार सुरुवात झाली आहे.आज सकाळपासून मुंबईत पाऊस सुरु आहे. तसेच राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये पावसाच्या यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, अमरावती, बुलढाणा, वाशिममध्ये यलो अलर्ट दिला आहे. तर रत्नागिरी, पुणे, ठाणे, अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला आहे.