आज (14 जून) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाते खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतील आणि त्याच्याकडून सत्कार स्वीकारला. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. तसंच निलेश लंकेंवर जोरदार टीकाही करण्यात आली. या भेटीनंतर आता निलेश लंकेंनी प्रसार माध्यमांनी प्रतिक्रिया देताना ही भेट अपघाती असल्याचं म्हटलं आहे.
गजा मारणेच्या भेटीबाबत निलेश लंके म्हणाले की, ही एक अपघाती भेट होती. मी दिल्लीची कामं आवरून काल एअरपोर्टला आलो होतो. त्यानंतर आमचा एक पवार नावाचा सहकारी होता, त्याचं कॅन्सरच्या आजाराने निधन झालं आहे. त्यामुळे मी त्यांच्या घरी गेलो होते. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर आमचा एक कार्यकर्ता आहे प्रवीण धनवे त्याच्या घरी जाताना मला काही लोकांनी हात केला. त्यानंतर त्यांनी आम्हाला आग्रह केल्यामुळे आम्ही थांबलो. आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि चेहा घेतला तेव्हा त्यांनी माझा सत्कार केला. तोपर्यंत मला त्या व्यक्तीची कोणतीही पार्श्वभूमी माहिती नव्हती, असं निलेश लंकेंनी स्पष्ट केलं.
पुढे त्यांनी सांगितले की, मला या भेटीनंतर तासाभरानी माझ्या पुण्यातील काही मित्रांचे फोन आले. त्यांनी मला विचारलं की तुम्ही ज्या भागात गेला होता तो कार्यक्रम पुर्वनियोजित होता का? त्यावर मी सांगितलं नाही ती एक सांत्वनपर भेट होती. बाकी दुसऱ्या कोणाकडे जाणं माझं पुर्वनियोजित नव्हतं. यानंतर मला या सगळ्याची पार्श्वभूमी माहिती झाली. ही एक अपघाती भेट असून माझ्याकडून नकळत चूक घडली आहे, असंही निलेश लंके म्हणाले.