लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला तर महाविकास आघाडील मोठं यश मिळालं आहे. या यशानंतर आता महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आज (15 जून) महाविकास आघाडीची एक बैठक होत आहे. मात्र या बैठकीआधी मविआमध्ये काही आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे.
आजच्या महाविकास आघाडीच्या या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. तर काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना या बैठकीचे निमंत्रण मिळाले नसल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
विजय वड्डेटीवारांना बैठकीचं निमंत्रण मिळालं नसल्यामुळे आणि नाना पटोले उपस्थित राहणार नसल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नेमकं सुरू काय आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच काँग्रेस विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.