बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती आज (15 जून) अचानक बिघडली. यानंतर त्यांना तातडीनं पाटण्यातील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या हाताला तीव्र वेदना होत होत्या.
आज सकाळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हाताला अचानक वेदना होऊ लागल्या. त्यामुळे त्यांना तात्काळ पाटणा येथील मेदांता रुग्णालयात नेण्यात आले जिथे ऑर्थोपेडिक विभागातील डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली. तर सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दिल्लीहून पाटण्याला परतलेल्या नितीश कुमार यांनी शुक्रवारी (14 जून) मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांचा बेरोजगारी भत्ता, घर भत्ता यासह 25 महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आला. JDU ने 29 जून रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. त्यासाठीची तयारीही सुरू आहे. तर नुकतीच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे.